
संतोष देशमुख यांच्या हत्येला सात दिवस पूर्ण होतात. विरोधकांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासन हे सतर्क झाले आहे. सीआयडी चे पथक दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे.
सीआयडी चे संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. मात्र नेमकी त्यांनी काय चर्चा केली याची माहिती मिळाली नाही.
