ODI Cricket Rules : क्रिकेट जगतात सध्या टी २० क्रिकेटची धूम आहे. मात्र टी २० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेट काहीसं मागे पडत चाललं आहे. त्यामुळे आता एकदिवसीय क्रिकेटची (ODI Cricket) रंगत वाढवण्यासाठी आयसीसीच्या क्रिकेट समितीने क्रांतीकारी बदलाची योजना बनवली आहे. दुबईत झालेल्या आयसीसी क्रिकेट समितीच्या (ICC Cricket Committee) बैठकीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक नियम बदलण्याची (Rule Change) शिफारस करण्यात आली आहे. ज्यामुळे एकदिवसीय क्रिकेट रंगतदार होणार आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीत सौरभ गांगुली, महेला जयवर्धने, व्ही व्ही एस लक्ष्मण, शॉन पॉलॉक, डेनिअल व्हिटोरी, रॉजर हार्पर आणि जय शाह उपस्थित होते.