दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ (Pushapa2:The Rule) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच तुफान कमाई केली आहे. अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची क्रेझ फक्त भारतातच नाही, विदेशातही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने अमेरिकेत दहा लाख डॉलर कमावले आहेत. अमेरिकेतील प्रीमियर शोच्या तिकीट विक्रीतून या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच १० लाख डॉलरहून अधिक कमाई केली आहे.अमेरिकेत ‘पुष्पा २’ या चित्रपटाचा प्रीमियर ४ डिसेंबरला होणार असून ऍडव्हान्स तिकीट बुकिंगसाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. आतापर्यंत अमेरिकेतील ८५० लोकेशनवर या चित्रपटाची ४० हजार तिकिटे विकली गेली असून यातून निर्मात्यांनी दहा लाख डॉलरहून अधिक कमाई केली आहे. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट येत्या ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहे. नेटफ्लिक्सने पुष्पा २’ चित्रपटाचे डिजिटल राइट्स तब्बल २७५ कोटींना खरेदी केले आहेत.