बर्मिंगहॅम :- बाविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा अखेरचा दिवस भारताने गाजवला. झटपट चार गोल्ड मेडल जिंकण्याची किमया भारताने साधली. यामुळे बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात २२ गोल्ड, १५ सिल्व्हर आणि २३ ब्राँझ अशा ६० मेडलची नोंद झाली. भारत २२ गोल्ड मेडलसह मॅडल टॅलीत चौथ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलिया ६६ गोल्डसह (एकूण मेडल १७७) पहिल्या, इंग्लंड ५६ गोल्डसह (एकूण मेडल १७०) दुसऱ्या आणि कॅनडा २६ गोल्डसह (एकूण मेडल ९२) तिसऱ्या स्थानावर आहे.
अखेरच्या दिवशी बॅडमिंटनमध्ये भारताने ३ गोल्ड मेडल जिंकली. महिला एकेरीत पी. व्ही सिंधू तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन या दोघांनी गोल्ड मेडल जिंकले. यानंतर पुरुष दुहेरीत सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने गोल्ड मेडल जिंकले.
टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या अनुभवी अचंता शरथ कमल याने गोल्ड मेडल जिंकले. तसेच जी. साथियान याने टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत ब्राँझ मेडल जिंकले. हॉकीचा सामना सुरू आहे. यात भारत काय करतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.
जिंकलेली ६० पदके
साईखोम मिराबाई चानू – वेटलिफ्टिंग ( महिला ४९ किलो) – सुवर्ण
जेरेमी लालरिननुंगा – वेटलिफ्टिंग (पुरुष ६७ किलो) – सुवर्ण
अचिंता शेउली – वेटलिफ्टिंग (पुरुष ७३ किलो) – सुवर्ण
रुपा राणी तिर्की, लव्हली चौबे, नयनमोनी सैकिया, पिंकी सिंह – लॉन बॉल्स (चार महिला) – सुवर्ण
हरमीत देसाई, साथियान ज्ञानसेकरन, सुनिल शेट्टी, अचंता शरथ कमल (पुरुष टेबल टेनिस) – सुवर्ण
सुधीर (पॅरा पॉवर लिफ्टिंग, पुरुष हेवीवेट) – सुवर्ण
बजरंग पुनिया (कुस्ती पुरुष ६५ किलो फ्रीस्टाईल) – सुवर्ण
साक्षी मलिक (कुस्ती महिला ६२ किलो फ्रीस्टाईल) – सुवर्ण
दीपक पुनिया (कुस्ती पुरुष ८६ किलो फ्रीस्टाईल) – सुवर्ण
रवी कुमार दहिया (कुस्ती पुरुष ५७ किलो फ्रीस्टाईल) – सुवर्ण
विनेश फोगट (कुस्ती पुरुष ७४ किलो फ्रीस्टाईल) – सुवर्ण
नवीन मलिक (कुस्ती पुरुष ७४ किलो फ्रीस्टाईल) – सुवर्ण
भाविना पटेल (टेबल टेनिस महिला एकेरी सी थ्री फाईव्ह) – सुवर्ण
नीतू गंघासो (महिला बॉक्सिंग ४८ किलो) – सुवर्ण
अमित पंघाली (पुरुष ५१ किलो बॉक्सिंग) – सुवर्ण
एल्धोस पॉल (पुरुष ट्रिपल जम्प) – सुवर्ण
निखत झरीन (बॉक्सिंग महिला ५० किलो) – सुवर्ण
अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला (टेबल टेनिस मिश्र दुहेरी) – सुवर्ण
पी. व्ही. सिंधू (महिला एकेरी बॅडमिंटन) – सुवर्ण
लक्ष्य सेन (पुरुष एकेरी बॅडमिंटन) – सुवर्ण
सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (पुरुष दुहेरी बॅडमिंटन) – सुवर्ण
अचंता शरथ कमल (टेबल टेनिस पुरुष एकेरी) – सुवर्ण
संकेत सरगर (वेटलिफ्टिंग पुरुष ५५ किलो) – रौप्य
बिंद्यारानी देवी (वेटलिफ्टिंग महिला ५५ किलो) – रौप्य
सुशीला देवी लिकमाबाम (ज्युडो महिला ४८ किलो) – रौप्य
विकास ठाकुर (वेटलिफ्टिंग पुरुष ९६ किलो) – रौप्य
भारत बॅडमिंटन टीम (मिक्स्ड टीम । श्रीकांत किदाम्बी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी, बी सुमीत रेड्डी, लक्ष्य सेन, चिराग शेट्टी, गायत्री गोपीचंद, त्रीसा जॉली, आकर्षी कश्यप, अश्विनी पोनप्पा, पी. व्ही. सिंधू) – रौप्य
तुलिका मान (ज्युडो महिला ७८+ किलो) – रौप्य
मुरली श्रीशंकर (पुरुष लाँग जम्प) – रौप्य
अंशु मलिक (कुस्ती महिला ५७ किलो फ्रीस्टाईल) – रौप्य
प्रियांका गोस्वामी (महिला १० हजार मीटर वॉक) – रौप्य
अविनाश साबळे (पुरुष ३ हजार मीटर स्टीपलचेस) – रौप्य
सुनिल बहादुर, नवनीत सिंह, चंदन सिंह, दिनेश कुमार (लॉन बॉल्स चार पुरुष) – रौप्य
अब्दुल्ला अबुबकर (पुरुष ट्रिपल जम्प) – रौप्य
साथियान ज्ञानसेकरन आणि अचंता शरथ कमल (टेबल टेनिस पुरुष दुहेरी) – रौप्य
भारत महिला क्रिकेट टीम (टी २०) – रौप्य
सागर अहलावत (बॉक्सिंग पुरुष ९२+ किलो) – रौप्य
गुरुराजा पुजारी (वेटलिफ्टिंग पुरुष ६१ किलो) – कांस्य
विजय कुमार यादव (ज्युडो पुरुष ६० किलो) – कांस्य
हरजिंदर कौर (वेटलिफ्टिंग महिला ७१ किलो) – कांस्य
लव्हप्रीत सिंह (वेटलिफ्टिंग महिला १०९ किलो) – कांस्य
सौरव घोषाल (स्क्वॅश पुरुष एकेरी) – कांस्य
गुरदीप सिंह (वेटलिफ्टिंग पुरुष १०९+ किलो) – कांस्य
तेजस्विन शंकर (पुरुष हाय जम्प) – कांस्य
दिव्या काकराणी (कुस्ती महिला ६८ किलो फ्रीस्टाईल) – कांस्य
मोहित ग्रेवाल कुस्ती पुरुष १२५ किलो फ्रीस्टाईल) – कांस्य
जास्मिन लॅम्बोरिया (बॉक्सिंग महिला लाइटवेट) – कांस्य
पूजा गेहलोत (कुस्ती महिला ५० किलो फ्रीस्टाईल) – कांस्य
पूजा सिहाग (कुस्ती महिला ७६ किलो फ्रीस्टाईल) – कांस्य
मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग पुरुष फेदरवेट) – कांस्य
दीपक नेहरा (कुस्ती पुरुष ९७ किलो फ्रीस्टाईल) – कांस्य
सोनलबेन पटेल (टेबल टेनिस महिला एकेरी सी थ्री फाईव्ह) – कांस्य
रोहित टोकस (बॉक्सिंग पुरुष वॉल्टरवेट) – कांस्य
भारतीय महिला हॉकी टीम – कांस्य
संदीप कुमार (पुरुष १० हजार मीटर वॉक) – कांस्य
अन्नु राणी (महिला जॅव्हलिन थ्रो) – कांस्य
सौरव घोषाल आणि दिपिका पल्लीकल (स्क्वॅश मिश्र दुहेरी) – कांस्य
श्रीकांत किदाम्बी (बॅडमिंटन पुरुष एकेरी) – कांस्य
गायत्री गोपीचंद आणि त्रीसा जॉली (बॅडमिंटन महिला दुहेरी) – कांस्य
जी. साथियान (टेबल टेनिस पुरुष एकेरी) – कांस्य